Advertising

Property Card Online: प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये कसं काढायचं? | सिटी सर्वे उतारा | प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन

Advertising

Advertising

नमस्कार मित्रांनो,

प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक. महाराष्ट्र सरकारने आता प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता. ते कसं काढायचं, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या सातबारा उताऱ्यावर शेत जमिनीच्या संबंधित सर्व माहिती असते. त्याचप्रमाणे, बिगर शेतजमीन असलेल्या व्यक्तीच्या नावावर किती मालमत्ता आहे याची माहिती देखील मिळवता येऊ शकते. सरकारने स्वामित्व योजना आणली असून या योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या जमिनीचे व घरांचे प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहे. प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक किंवा मिळकत पत्रिका, ज्यामध्ये बिगर शेतजमीन असलेल्या ठिकाणी व्यक्तीच्या नावावर किती मालमत्ता आहे याची माहिती असते.

प्रॉपर्टी कार्डवर त्या व्यक्तीचे घर, बंगला, व्यवसायाची इमारत इत्यादी स्थावर मालमत्तेची माहिती असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये पाहता येते. परंतु, शासकीय बाबींसाठी हे उतारा वापरता येणार नाही. हे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन कसे बघायचे ते जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Advertising

प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे:

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला महाभूमिलेखच्या अधिकृत वेबसाईट www.mahabhumi.gov.in वर जायचे आहे.

स्टेप 2: वेबसाईट ओपन झाल्यावर एक नवीन टॅब उघडेल. त्यात तुम्हाला बिगर शेतजमीन/घर बद्दल तपशील पाहायचा असेल तर उजव्या बाजूला स्क्रोल करून माहिती भरा. तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे आणि नंतर ‘Go’ पर्यायावर क्लिक करायचे आहे.

प्रमुख विभाग – अमरावती, औरंगाबाद, कोंकण, नागपूर, नाशिक, पुणे. तुम्ही तुमच्या जवळचा प्रमुख विभाग निवडा.

स्टेप 3: आता पुढील पृष्ठावर तुमच्या विभागाचे नाव दिसेल. त्याखाली ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक असे तीन पर्याय दिसतील. ‘मालमत्ता पत्रक’ पर्यायावर क्लिक करा आणि जिल्हा व नंतर तालुका/न.भु.का. निवडा. त्यानंतर बिगर शेतजमीन किंवा घर ज्या गावात आहे ते गाव/गावपेठ निवडा.

स्टेप 4: आता तुम्हाला सिटी सर्वे नंबर (CTS No) किंवा न. भु.क्र. टाकायचा आहे. (तुम्ही तुमचा CTS नंबर तुमच्या पहिले नाव आणि आडनाव टाकून शोधू शकता.) व नंतर ‘नाव शोधा’ या बटनावर क्लिक करा.

स्टेप 5: तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ‘मालमत्ता पत्रक पहा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6: दिलेला कॅप्चा टाका आणि ‘verify’ पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 7: आता पुढील पृष्ठावर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच तुमचे मालमत्ता पत्रक/सिटी सर्वे उतारा दिसेल.

प्रॉपर्टी कार्ड कसे वाचायचे:

सर्वात वर तुम्हाला गावाचे नाव, तालुका आणि जिल्हाचे नाव दिलेले आहे. त्यानंतर नगर भूमापन क्रमांक/सिटी सर्वे नंबर व त्याचे क्षेत्र किती आहे ते दिलेले आहे. त्यानंतर सदर जागा किंवा प्लॉट कुणाच्या नावावर आहे त्याची माहिती दिलेली आहे. सर्वात खाली महत्त्वाची सूचना दिलेली असते.

महत्वाची गोष्ट: हे प्रॉपर्टी कार्ड तुम्ही कोणत्याही शासकीय बाबींसाठी वापरू शकत नाही. शासकीय कामासाठी डिजिटल प्रॉपर्टी कार्ड लागते. डिजिटल प्रॉपर्टी कार्ड कसे मिळवायचे याबद्दल माहिती पाहण्यासाठी हा लेख वाचा => डिजिटल स्वाक्षरीसह प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं मिळवायचं?

तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही एक रुपया ही न देता प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. हा लेख तुम्हाला आवडला असेल, व यातील माहिती वाचून तुम्हाला फायदा झाला असेल, तर कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment