Advertising

Ladaki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status Check Online | Bank Seeding Status | लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी हे काम लगेच करा

Advertising

Advertising

माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून 1 जुलै पासूनच अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सदर योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आणि या प्रकारे अनेक लाखो महिलांनी आत्ता पर्यंत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी बऱ्याच महिलांचे फॉर्म आता अप्रुव्ह देखील झाले आहेत.

तुमचा फॉर्म सुद्धा जर अप्रुव्ह झाला असेल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी म्हणजे येत्या रक्षाबंधनला पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अश्या दोन्ही महिन्यांचे 3000/- रुपये जमा होणार आहेत. परंतु तुमचं आधार कार्ड जर बँकेला लिंक असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचं आधार बँक खात्याला लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं? तर मित्रांनो, हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच चेक करू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं आधार कोणत्या बँकेला लिंक आहे. आणि जर लिंक नसेल तर काय करायचं? अश्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या लेखात मिळणार आहेत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

कोणत्या बँक खात्यात येणार माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता?

स्टेप 1: मित्रांनो, तुमचे कोणते बँक खाते आधार शी लिंक आहे हे पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आधारच्या म्हणजेच UIDAI च्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे. आधार कार्ड UIDAI वेबसाइट => myaadhaar.uidai.gov.in

Advertising

स्टेप 2: त्या नंतर तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर लॉगिन करायचे आहे. त्यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर व दिलेला कॅपचा टाकून ‘OTP ने लॉगिन करा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: त्या नंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून नंतर login बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: परत एकदा तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील त्यातील ‘बँक सीडिंग स्टेटस/ Bank Seeding Status’ या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

स्टेप 6: त्या नंतर तुमच्या आधार कार्ड शी लिंक आलेले बँक खाते इथे दाखवले जाईल. त्यात हे बँक खाते कधी पासून लिंक आहे, बँक अकाउंट नंबर चे शेवटचे चार डिजिट, आणि अकौंटची सध्याची स्थिती म्हणजे ऍक्टिव्ह आज की इनऍक्टिव्ह ते दाखवले जाईल.

मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता हा DBT प्रणाली द्वारे वितरित केला जाणार आहे. जे अकाउंट इथे ऍक्टिव्ह आले तेच बँक अकाउंट / खाते तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या DBT साठी वापरू शकता. तसेच हेच खाते तुम्ही प्रत्येक योजनेच्या DBT साठी देखील वापरू शकता.

पण मित्रांनो, जर इथे तुमचे बँक इनऍक्टिव्ह दाखवत असेल किंवा इतर ही कोणतेच बँक दाखवत नसेल, तर अश्या वेळी तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्टाचे डिजिटल अकाउंट काढू शकता, त्याची लिंकिंग ची प्रोसेस दोन ते तीन दिवसात पूर्ण होऊन जाईल. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्या ही बँकेत जाऊन आधार DBT mpci ला लिंकिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी बँकेत एक फॉर्म भरून द्यावा लागेल व त्या नंतर तुमचं आधार बँक लिंकिंग पूर्ण होऊन जाईल.

Leave a Comment