Advertising

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | Ration Card Details Check Online

Advertising

Advertising

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Ration Card Details Check Online in Marathi

मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड हे तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून एक खूप महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पण त्याही पेक्षा जास्त तुमचे रेशन हे तुमच्यासाठी अन्न धान्य पूरवण्याचे एक साधन देखील आहे. या रेशन कार्ड मार्फतच शासन तुम्हाला मोफत धान्य देत असते. पण बऱ्याचवेळा रेशन दुकानदार कमी धान्य देतात आणि स्वतः मात्र ते धान्य बाहेर विकतात. त्यामुळे तुमच्या हक्काचे रेशन तुम्हाला मिळायलाच हवे.

तुम्हाला रेशन कार्ड वर किती धान्य मिळते चेक करा

मित्रांनो, शासनाकडून आपल्याला किती धान्य मिळते? रेशन दुकानदार देखील आपल्याला तेवढेच धान्य देत आहे का , हे जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. कारण आता तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईल वरून ही माहिती मिळणार आहे. या बद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: मित्रांनो, यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वरून  मेरा रेशन ( Mera Ration) हे मोबाईल ऍप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे.

Advertising

स्टेप 2: त्यानंतर ऍप ओपन झाल्या वर तुम्हाला होम पेज म्हणजेच Main Menu च्या पेज वर वर वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करायचे आहे..

स्टेप 3: त्या नंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.

स्टेप 4: त्या नंतर पुढे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातील ‘लाभ माहिती’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5: त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक व आधार कार्ड क्रमांक असे दोन पर्याय दिसतील. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला रेशन कार्ड क्रमांक माहीत नसतो, त्यामुळे इथे आपण आधार कार्ड क्रमांक हा पर्याय सिलेक्ट करणार आहोत.

स्टेप 6: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमची काही माहिती आलेली दिसेल ज्यात तुमचे मूळ राज्य, मूळ जिल्हा, योजना कोणती आहे, तुमचा रेशन कार्ड चा बारा अंकी क्रमांक, रेशन दुकानदाराचा दुकान नंबर, महिना आणि वर्ष असे लिहिलेले दिसेल, ही माहिती चेक करून घ्यायची आहे.

आता या नंतर दिलेल्या जागी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचं आहे. व नंतर सबमिट (Submit) बटन क्लीक करायचे आहे

आता त्या नंतर खाली चालू महिन्याचा तपशील मध्ये तुम्हाला कोणते धान्य मिळणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. तसेच त्याची किंमत किती आहे, व किती किलो धान्य मिळणार हे देखील लिहिलेले दिसेल. इथे Rate च्या कॉलम मध्ये शून्य लिहिले आहे, म्हणजे तुम्हाला रेशन दुकानदाराला धान्याचे पैसे द्यायचे नाहीत.

या माहिती वरून तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार शासनातर्फे किती धान्य मिळेल याची माहिती मिळते. मित्रांनो, तुम्हाला जर सरकार कडून मिळणारे धान्य आणि रेशन दुकानदार देणारे धान्य यामध्ये काही तफावत आढळून आल्यास तुम्ही त्याची तक्रार देखील करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळायला पाहिजे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Leave a Comment