ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 | अटल बांधकाम कामगार आवास योजना २०२४ मराठी

ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 या योजनेंतर्गत बांधकाम कामगारास त्याचे स्वतःचे घर बांधकाम करण्यासाठी २ लाख पर्यंत अनुदान देण्यात येते. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याचे हक्काचे नवीन घर बांधकामास किंवा जुने कच्चे घर पक्के बांधून घेण्यसाठी २ लाख रुपये पर्यंत बांधकाम कामगार अनुदान देण्यात येते.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन जर अर्ज केला गेला तर त्या बांधकाम कामगारास जमीन खरेदी व घर बांधकामासाठी च्या इतर खर्च ची भरपाई म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ५०,००० रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करून देण्यात येते. हे अर्थ सहाय्य लाभार्थ्यच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

भारत सरकार नेहमीच समाजातील वेगवेगळ्या प्रवर्गातील आणि समाजातील लोकांसाठी वेगळ्या कल्याणकारी योजना घेऊन येत असते. बांधकाम कामगार हा देखील आपल्या समाजातील एक महत्वाचा घटक आहे. इतरांचे घरकुल तयार करणाऱ्या बांधकाम कामगाराला देखील आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे वाटत असते परंतु आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने बांधकाम कामगाराला आपले पक्के घर बंधने अशक्य होते. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने अटल बांधकाम कामगार योजना हि योजना बांधकाम कामगारांसाठी आपले घर निर्माण करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजने ला अटल बांधकाम योजना असे देखील म्हटले जाते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या ग्रामीण भागातील बांधकाम कामगारास स्वतःच्या , पत्नी किंवा पतीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा जुन्या कच्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी १.५० लाख रुपये इतके अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा कडून उपलब्ध करून देण्यात येईल.

महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर मान्य असणारे १८,००० तसेच स्वच्छ भारत अभियानातर्गत शौछालाय बांधण्यासाठी मान्य असणारे १२,००० रुपये असे एकूण ३०,००० रुपये अनुदान या १.५ लाख रुपये मिळालेल्या अनुदान मध्ये समाविष्ठ आहेत. म्हणून या योजनांचा लाभाचा परत अर्ज करता येणार नाही. अटल बांधकाम कामगार योजना मध्ये शौचालय आणि स्नानगृह बंधनकारक असल्यामुळे घरात स्वच्छता राहून घरातील कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहील. त्या शिवाय यांच्या बांधकामासाठी सरकार आर्थिक मदत देखील करणार आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा .

अटल बांधकाम कामगार आवास योजना ची पात्रता

अटल बांधकाम कामगार आवास योजना ची पात्रता खालीलप्रमाणे असेल.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेला पाहिजे. तसेच तो सक्रीय बांधकाम कामगार असणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

अश्या बांधकाम कामगाराने अटल बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी पात्र राहतील.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी एकूण २६९ चौ .फुट.इतके क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. या घर साठी योजनेंतर्गत त्या लाभार्थ्याला १.५ लाख इतके अनुदान मंडळाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येईल. परंतु जर लाभार्थ्याला या पेक्षा जास्त जागेत बांधकाम करायचे असेल आणि त्या करीता जास्त खर्च येणार असेल तर तसे करण्यास लाभार्थ्याला मुभा आहे परंतु हा खर्च त्याला करावा लागेल या साठी कुठलेही अनुदान मिळणार नाही.

अटल बांधकाम कामगार आवास योजना अतंर्गत घर बांधण्यासाठी खालीलप्रमाणे नियम असतील

अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत बांधकाम मंडळाच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारास घर बांधकाम करण्यसाठी खालील पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • घराचे संपूर्ण बांधकाम विटा,वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे.घरकुलामध्ये एक स्वयंपाक घर व बैठक हाल यांचा समावेश असणे घरजेचे आहे. सौचालाय व स्नानगृह असणे बंधनकारक आहे.
  • घराची उंची जमिनीपासून कमीतकमी १० फुट असणे गरजेचे आहे.
  • घराचे छत मजबूत लोखंडी किंवा सिमेंट चे पत्रे यांचा वापर करून तयार करू शकतात. किंवा कौलारूचा देखील वापर केल्यास चालेल.
  • घराच्या दर्शनी भागावर मंडळाचे बोध चिन्ह ( लोगो) लावणे बंधन कारक आहे .

उपर्युक्त मंडळाचा लोगो घराच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असेल.

अटल बांधकाम कामगार आवास योजना साठी लाभार्थी पात्रता काय असेल

अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष खालिलप्रकारे असतील.

  • अटल बांधकाम कामगार आवास योजना चा लाभ घेऊन घरकुल बांधकामासाठी अनुदान मिळण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा चा नोंदणीकृत सक्रीय सदस्य असावा. तसेच अर्ज करतेवेळी तो अर्जदार हा मंडळाकडे कमीतकमी एक वर्षापासून नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे किंवा त्याच्या पत्नीचे किंवा पतीचे महाराष्ट्र राज्यात इतर कुठेही घर नसावे तसेच अश्या आशयाचे घोषणापत्र त्या अर्जदाराला सदर करणे गरजेचे आहे जर तसे आढळले तर अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी त्याच्या किंवा त्याच्या पती किंवा पत्नीच्या नावाची जमीन असणे गरजेचे आहे किंवा त्या जमिनीवर जर कच्चे घर असेल तर त्या ठिकाणी तो पक्के घर बंधू शकतो.
  • अश्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराने इतर कुठ्ल्याहि घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा , तसे स्वय्घोषित घोषणापत्र सदर करणे घरजेचे असेल.
  • एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर अर्जदार पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना साठी लागणारे कागदपत्रे

अटल बांधकाम कामगार आवास योजना साठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा चा नोंदणीकृत बांधकाम कामगाराकडे ( ग्रामीण ) अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सोबत खाली नमूद केलेली कागदपत्रे असणे गरजेचे आहेत.

  • सक्षम अधिकार्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र /ग्रामपंचायती मधील मालमत्ता नोंदवही वरील उतारा
  • अर्जदाराच्या स्वतःच्या नावाच्या कार्यरत असलेया बचत खात्याच्या पासबुकाची प्रत
  • प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अपात्र असल्याबाबत सक्षम अधिकार्याचे पत्र .

अटल बांधकाम कामगार आवास योजना अतंर्गत अर्ज करण्याची पद्धत

अटल बांधकाम कामगार आवास योजना अतंर्गत अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत पोर्टल वरून किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल.

Leave a Comment